पहिला घटस्फोट, दुसर्‍याशी वाद अन् तिसर्‍याकडून लग्नाच्या आमिषाने अत्याचार

विचित्र घटना: जळगावातील तरुणाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
पहिला घटस्फोट, दुसर्‍याशी वाद अन् तिसर्‍याकडून लग्नाच्या आमिषाने अत्याचार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पहिल्या पतीपासून घटस्फोट (Divorce), तर दुसर्‍या पतीपासून अपत्य (Offspring) असतांनाही महिला सोशल मिडीयाच्या माध्यमातून तरुणाच्या संपर्कात आली. या तरुणाने वेळावेळी शारिरीक अत्याचार (Physical abuse) केल्याची तक्रार महिलेने (woman) एमआयडीसी पोलिसात (MIDC Police) दिली असून त्यावरुन शनिवारी कमलेश उर्फ बंटी जयपाल मखीजा (Bunty Jaipal Makhija) (रा.सिंधी कॉलनी) या तरुणाविरोधात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

पीडित महिलेचे 2010 मध्ये पहिले लग्न झाले आहे. पहिल्या पतीपासून एक मुलगा देखील आहे. आपसातील वादातून या महिलेने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेऊन वर्धा येथील तरुणाशी 2017 मध्ये दुसरे लग्न केले. दरम्यान, पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्याने माहेरच्या लोकांनी महिलेपासून संपर्क तोडला होता, ते बोलत नव्हते. अशातच दुसर्‍या पतीपासूनही एक अपत्य झाले. याच काळात जळगावातील कमलेश मखीजा या तरुणाशी सोशल मीडियावर ओळख झाली. काही दिवसानंतर त्याच्याशीही वाद झाल्याने विवाहिता जळगावात कमलेशच्या घरी आली.

तरुणाकडून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

तेथे त्याच्या कुटुंबियांनी तुझ्या पतीपासून घटस्फोट घेत असेल तर कमलेशशी लग्न करायला आमची हरकत नाही असे सांगितल्याने महिलेने तशी तयारी दर्शवली. दरम्यान, काही दिवस या तरुणाकडे थांबल्यानंतर ही महिला पुन्हा वर्धा येथे पतीकडे गेली. त्यानंतर पुन्हा जळगावात कमलेशच्या घरी आली. जून ते 10 ऑगस्ट या कालावधीत कमलेश याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. याच काळात कोर्ट व इतर कामासाठी दोन लाखाच्यावर रक्कम देखील कमलेशला दिली. त्याने ती रक्कम देण्यास नकार दिला. सारखा तगादा लावल्यानंतर ही रक्कम परत मिळाली, मात्र लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला व लग्न केले नाही म्हणून विवाहितेने तक्रार दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com