अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या वरच

अतीपावसामुळे खरीपाचे नुकसान होउनही शासनाच्या दृष्टिने शेतशिवार ऑल इज वेल
संग्रहीत चित्र
संग्रहीत चित्र

जळगाव - jalgaon

जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी डिसेंबर अखेर जाहिर करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील लागवडीयोग्य १५०२ महसुली क्षेत्र परीसरातील गावांमधे खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या वरच जाहिर करण्यात आली. यावर्षी अतीपावसामुळे उडीद मूग, कपाशी तसेच कापणीला आलेली ज्वारीचे बहुतांश उत्पादन देखिल डिसकलर होउन नुकसान जवळपास १.५० लाक्ष हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसाल झाले होते.

या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात येवून काही ठिकाणी मदत देखिल देण्यात आली होती. परीणामी  जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट असल्याचे वास्तव समोर आले आहे. परंतु असे असले तरी जिल्हा प्रशासनाकडून पैसेवारी ५० पैशंाच्यावरच दाखवण्यात आली आहे.

त्यामुळे  जिल्हा प्रशासन व शासनाच्या दृष्टिने शेतशिवार ऑल इज वेल असल्याचा अहवालात म्हटले आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात गत जून ते सप्टेंबर आणि त्यानंतर ऑक्टोबरअखेरपर्यंत जोरदार पाऊस बरसला. सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले.

तसेच सोयाबीन, कपाशी, ज्वारी व तूर इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यात यंदा खरीप पिकांच्या उत्पादनातही घट झाल्याने, शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जिल्ह्यातील तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणूकांच्या रणधुमाळीच्या सुरूवातीलाच डिसेंबरमधे  जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या वरच दर्शविण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com