उपमहापौर गोळीबार प्रकरणातील पाचवा संशयित पोलिसांना शरण

गुन्ह्यात यापूर्वी चार संशयितांना अटक
उपमहापौर गोळीबार प्रकरणातील पाचवा संशयित पोलिसांना शरण

जळगाव - Jalgaon

शहरातील पिंप्राळ्यात (Pimprala) उपमहापौर कुलभूषण पाटील (Deputy Mayor Kulbhushan Patil) यांच्यावर गोळीबारप्रकरणी दाखल गुन्ह्यात रविवारी साायंकाळी साडे सहा वाजता फरार असलेला जुगल संजय बागुल वय २२ रा. मयुर हौसिंग सोसायटी, खोटेनगर, जळगाव हा रामानंदनगर पोलिसांना शरण आला आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी या गुन्ह्यात चार संशयितांना अटक झाली असून ते सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहेत.

पिंप्राळ्यातील मयुर कॉलनी येथे २५ जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह त्यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उमेश पांडुरंग राजपूत, महेंद्र पांडुरंग राजपूत, भूषण बिर्‍हाडे व मंगल युवराज राजपूत सर्व रा. पिंप्राळा या चौघांविरोधात रामानंदनगर पोलिसात (Ramanandnagar Police) गुन्हा दाखल झाला होता. चौकशीत पोलिसांनी किरण शरद राजपूत तसेच जुगल संजय बागूल हे आणखी दोन संशयित निष्पन्न केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com