उत्सव विशेष गाडी ही दररोज धावणार

प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा निर्णय
उत्सव विशेष गाडी ही दररोज धावणार

भुसावळ-(प्रतिनिधी) bhusaval -

मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष उत्सव गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या हंगामात प्रवाशांची होणारी संभाव्य अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी सध्याच्या विशेष उत्सव द्वि- साप्ताहिक गाडीच्या फेरीत वाढ करुन त्या दररोज चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दररोज धावणार्‍या विशेष गाड्या -

एलटीटी - गोरखपूर विशेष साप्ताहिक उत्सव- गाडी क्र. ०१०७९ विशेष उत्सव दि. १२ ते २६ नोव्हेंबरपर्यंत एलटीटी येथून दर गुरुवारी रवाना होऊन तिसर्‍या दिवशी गोरखपूर पोहोचेल. गाडी क्र. ०१०८० विशेष उत्सव दि. १४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोरखपूर येथून दर शनिवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.ही गाडी हरदा आणि भोपाळ वगळता नियमित ट्रेन क्रमांक ११०७९/११०८० प्रमाणे धावेेल. गाडीला १ टु टियर, ४ थर्ड एसी, १२ शयनयान, ३ द्वितीय आसन श्रेणी. असतील.

एलटीटी- मंडुआडीह विशेष उत्सव विशेष द्वि-साप्ताहिक दररोज धावणार- गाडी क्र. ०२१६७ विशेष उत्सव दि. १० ते ३० नोव्हेंबर दरम्यान एलटीटी येथून दररोज सुटेल आणि मंडुआडीह येथे दुसर्‍या दिवशी पोहोचेल. गाडी क्र. ०२१६८ विशेष उत्सव दि. ११नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत मंडुआडीह येथून दररोज रवाना होऊन दुसर्‍या दिवशी एलटीटी पोहचेल.या गाड्यांचे आरक्षण सुरु करण्यात आले आहे. केवळ आरक्षित असलेल्या प्रवाशांनाच या गाड्यांमध्ये चढण्याची व प्रवास करण्याची परवानगीदेण्यात आली आहे. प्रवासात प्रवाशांना कोविडच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com