घटनास्थळी झालेली गर्दी
घटनास्थळी झालेली गर्दी
जळगाव

मुलांच्या डोळ्यासमोर वडील धरणात बुडाले

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

पारोळा - Parola - प्रतिनिधी :

पारोळा येथील विद्यानगर मधील जडे कुटुंबिय आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास धरण पाहण्यासाठी तामसवाडी येथे आले होते.धरणाची नऊ गेट द्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदित सुरु होता.धरण पाहण्यास आलेल्या जडे कुटुंबियांना नदित पोहण्याचा मोह आवरता न आल्याने वडिल प्रविण जडे वय (50) व दोघे मुले अक्षय जडे(24),रुक्षीकेश जडे(21) गेट च्या बाजुला नदिच्या काठावरती पोहत होते.

पाोहुन झाल्यानंतर मुलगा अक्षय जडे नदिच्या काठावरती आला.तर वडिल प्रविण जडे व मुलगा रुष्षीकेश बाहेर येत असतांना धरण्याच्या दुसर्‍या गेट जवळ आल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने गेट कडे खोल भागात ओढले जात होते.त्यावेळी तेथे उपस्थित मच्छिमारांनी दोर फेकला असता रुषीकेष जडे दोर धरुन मच्छिमारांच्या मदतीने कसाबसा बाहेर आला.माञ प्रविण जडे हे गेट च्या खाली पाण्यात गेल्याने वरती आलेच नाही.

शव शोधण्यासाठी केले होते नऊ गेट बंद, एकतास उघडे-सद्यस्थितीला जलपातळी 266.20 मीटर एवढी आहे व धरण्यात पाण्याची आवक सुरुच असल्याने आज नऊ गेट उघडण्यात आले होते.पाण्यात पोहतांना इसम बुडाल्याची माहिती कळाल्यावर शव शोधण्यासाठी गेट एक तासासाठी बंद करण्यात आले होते.गावातील पट्टीच्या पोहणार्‍यांना पाचारण करण्यात आले.तसेच मच्छिमारांच्या मदतीने शव शोधण्याचे शर्तीचे प्रयत्न करुन देखील शव सापडले नाही.

यावेळी तहसीलदार अनिल गवांदे, प्रभारी पोलीस निरीक्षक श्री चव्हाण, धरण अधिकारी एम आर मीठ्ठे ,पी जे काकडे,व्ही एम पाटील,यासह अनिल पवार,शिवाजी पवार,यावेळी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केली होती.

Deshdoot
www.deshdoot.com