किरकोळ वाद वगळता निवडणुक प्रक्रिया सुरळीत

मतदान केंद्रांना अधिकाऱ्यांनी दिल्या भेटी
खडका येथील मतदान केंद्रावर लागलेली रांग (छाया - कालू शहा)
खडका येथील मतदान केंद्रावर लागलेली रांग (छाया - कालू शहा)

भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal

तालुक्यातील २४ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानासाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत तालुक्यात ५६.८१ टक्के मतदान झाले. तालुक्यात शांततेत मदान प्रक्रिया सुरु असून तालुक्यात कुठलीही अप्रीय घटना घडली नसल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.


सकाळपासून तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया सुरु झाली असून सकाळी ७.३० ते ९.३० वा. पहिल्या टप्प्यात २९४७ स्त्रिया, ४२०५ पुरुष अशा ७१५२ मतदारांनी (१०.५४ टक्के), दुसर्‍या टप्प्यात ११.३० वाजेपर्यंत ८३३ स्त्रीया, ९१०८ पुरुष अशा एकुण १७हजार ५४१ मतदार (२५.८५ टक्के), दुपारी दीड वाजेपर्यंत १५हजार ३१७ महिला, १५हजार १४८ पुरुष अशा एकुण ३० हजार ४६५ मतदार (४०.५२) टक्के तर दुपारी ३.३० वाजे पर्यंत २१ हजार २१ महिला तर २१ हजार ५८८ पुरुष अशा४२ हजार ६०९ मतदार (५६.८१टक्के) मतदान पार पडले. सायंकाळी उशीरापर्यत नेमका आकडा सममोर येईल. निवडणुक प्रक्रिये दरम्यान कुठलीही अप्रीय घटना घडली नसली तरी तालुक्यातील खडका व साकेगाव येथे किरकोळ वाद उद्भवल्यामुळे तेथे कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीपक धिवरे, नायब तहसीलदार संजय तायडे, डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे, पो.नि. रामकृष्ण कुंभार, पो.नि. दिलीप भागवत, पो.नि. बाबासाहेब ठोंबे परिश्रम घेत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com