<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी जकातनाक्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बांभोरी येथील आयशर ट्रक महामार्गालगत 70 ते 80 फूट खोल कोसळल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.</p>.<p>किमान सात ते आठ झाडे तोडून तसेच दहा ते 12 वेळा उलटत ट्रक एका ठिकाणी अडकला होता. 70 ते 80 फूट खोल ट्रक कोसळल्यानंतरही दैव बलवत्तर म्हणून अपघातात ट्रकचालक राजू माळी रा पाळधी हा बचावला आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली असून ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहेत. तब्बल पाच ते सहा तासानंतर बांभोरी तरुण तसेच नागरिकांच्या सहकार्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा आयशर ट्रक बाहेर काढण्यात आला.</p>