जिल्ह्याला उद्या मिळणार 1360 रेमडेसिवीरचे इंजेक्शन

माजी मंत्री खडसेंच्या प्रयत्त्नांना यश
जिल्ह्याला उद्या मिळणार 1360 रेमडेसिवीरचे इंजेक्शन
USER

जळगाव - Jalgaon

कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे मात्र, या बाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी वेळोवेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे रेमडेसिवीर पुरवठ्या बाबात सातत्यांने पाठपुरावा करून त्यांच्याकडे रेमडीसिव्हर इंजेक्शनची मागणी केली होती, उद्या दि.13 एप्रील मंगळवार रोजी पुन्हा जिल्ह्यासाठी 1360 रेमडीसिवर इंजेक्शनच पुरवठा केला जाणार असुन हे इंजेक्शन...

सकाळी जिल्ह्यात दाखल होतील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आता जिल्ह्यासाठी 2000 इंजेक्शनची मागणी मंत्री राजेद्र शिंदे यांच्याकडे केली होती पंरतु सध्या देशांतील व राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जळगाव जिल्ह्यासाठी 1360 रेमडीसिव्हर इंजेक्शन पाठवत असून येत्या दोन तीन दिवसांत अजून रेमडीसिवर इंजेक्शनचा पुरवठा जळगाव जिल्ह्याला करू अशी माहीती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी माजीमंत्री एकनाथराव खडसेंना दिली.

गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून ही दुसरी लाट पहिल्या टप्प्यातील लाटेपेक्षा अधिक तीव्र आहे. त्यामुळे महिनाभरातच सक्रिय रुग्णांची संख्या दहापटीने वाढून ती १० हजारांच्या वर पोचली आहे. यातील बहुतांश रुग्णांना कोरोनावर उपयुक्त ठरणारे रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज भासत असून त्याची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण होऊन काळा बाजारही मोठ्याप्रमाणावर वाढला आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरल्याने यापुर्वी 4000 रेमडीसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा शासना कडून झाला होता व आता परत 1360 इंजेक्शन जिल्ह्याला मिळत आहे ऑक्सिजन पुरवठ्याबाबतही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अन्न व औषध प्रशासन विभाचे मंत्री राजेंद्र शिंगणे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे केली होती व जिल्ह्यांतील ॲाक्सिजन पुरवठा ही करायची विनंती मंत्रीद्वयांना केली होती त्यानुसार जिल्ह्यासाठी शासना कडून त्वरीत ऑक्सिजन पुरवठा हि करण्यात आला होता

या स्थितीत इंजेक्शन अभावी अनेक रुग्णांना जीवही गमवावा लागत असून जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाल्याने माजी मंत्री खडसेंनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त व अधिकार्यांसह स्थानिक निरीक्षक डॉ.अनिल माणिकराव यांच्याशी चर्चा करुन माहिती जाणून घेतली होती.

जळगाव जिल्ह्यातील रूग्णांनसाठी वेळोवेळी आवश्यक ती मदत केल्याबद्दल एकनाथराव खडसेंनी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार व्यक्त केले आहे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com