कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदीचा निर्णय योग्यच!

नागरिकांनी सहकार्य करण्याचे राजकीय पक्षातील प्रमुखांचे आवाहन
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदीचा निर्णय योग्यच!
USER

जळगाव - Jalgaon

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र आहे.त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १५ दिवस संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून नागरिकांनी सहकार्य सहकार्य करावे, शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी केले आहे.

राज्यात कोरोनाचा पून्हा उद्रेक होत आहे.दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र होत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी आणि विविध घटकांतील मान्यवरांशी चर्चा केल्यानंतर पून्हा एकदा संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी दि.१४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून केली जात आहे.यापार्श्‍वभूमीवर विविध राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी शासनाच्या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

काय म्हणाले , राजकीय पक्षाचे प्रमुख.....

कोरोनाचा संकट मोठा आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पून्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहे.शासनाच्या नियमांचे पालन करावे.जनतेने सहकार्य करावे.स्वत:ची काळजी घ्यावी.आपत्कालीन परिस्थितीत सकारात्मक वातावरण निर्माण करावे.
- ॲड.रवींद्रभैय्या पाटील
जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस.


कोरोना संसर्गाची ब्रेक द चेन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे.सर्वांशीच चर्चा करुन त्यांनी निर्णय घेतला आहे.निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नव्हता.त्रायदायक असला तरी हिताचा आहे.नागरिकांनी सहकार्य करावे.
-ॲड.संदीपभैय्या पाटील
जिल्हाध्यक्ष,कॉंग्रेस.


कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.नागरिकांनी नियमांचे पालन करावे.विनाकारण बाहेर फिरु नये.शासनाने संचारबंदी लागू करुन गरिबांसाठी अर्थसहाय्याती घोषणा केली आहे.त्यामुळे या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी.
- दीपक सूर्यवंशी
महानगराध्यक्ष,भाजप.


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. अतिशय योग्य निर्णय घेतला असून नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. तसेच कामगार,फेलीवाले,गोरगरिबांसाठी अर्थसहाय्य देण्याचा योग्य निर्णय आहे.
- शरद तायडे
महानगरप्रमुख,शिवसेना.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com