मयत कर्मचार्‍यास ५० लाखाचे सानुग्रह सहाय्य मिळावे
जळगाव

मयत कर्मचार्‍यास ५० लाखाचे सानुग्रह सहाय्य मिळावे

नगरसेवक मयूर कापसे यांची निवेदनाद्वारे मागणी

Ramsing Pardeshi

जळगाव- Jalgaon

शहर महापालिकेतील कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावित असताना मृत्यू होणार्‍या कर्मचार्‍यांना रू.५०.०० लाखाचे विमा कवच/ सानुग्रह सहाय्य लागू करण्याची मागणी मयूर चंद्रकांत कापसे यांनी निवेदाद्वारे आयुक्त यांना केली आहे.

या निवेदनात मयूर कापसे यांनी महाराष्ट्र शासनाने दि.२९ मे २० रोजीच्या शासन निर्णयान्वये कोरोनाच्या साथी मध्ये सर्वेक्षण, शोध घेणे, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदत कार्य यांच्याशी संबंधित कर्तव्य बजावत असताना सदरील कामावर कार्यरत असणारे अधिकारी/ कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यास संबंधितास रु.५०.०० लाख सानुग्रह सहाय्य आला करण्याचा शासन निर्णयाचा उल्लेख केला आहे. त

सेच त्यांनी या पूर्वी दि. १३ एप्रिल २० रोजी याबाबत चे निवेदन पत्र सोबत दिलेले असून त्या अनुषंगाने दि. २४ रोजी स्थानिक वृत्तपत्रात प्रभाग क्र.३, १६ व १७ येथे सार्वजनिक बांधकाम विभागात मुकादमाची जबाबदारी सांभाळणारा कर्मचार्‍याचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचा उल्लेख केलेला असून संबंधित कर्मचार्‍यास रू.५०.०० लाख सानुग्रह अनुदान तात्काळ मिळण्याची विनंती केलेली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com