विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यातील पातोंडा येथे घरातून शौचासाठी बाहेर गेलेल्या एका २५ वर्षीय विवाहितेचा विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनम पांचाळ असे मयताचे नाव आहे.

Title Name
दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल आवश्यक
विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

श्रावण फकीरा पांचाळ (सोनवणे) हे पातोंडा येथे पत्नी, मुले, सुना व नातवंडांसोबत वास्तव्यास आहेत. श्रावण पांचाळ हे हातमजुरी करून आपले उदरनिर्वाह करीत असतात. मोठा मुलगा सुरेश याचा विवाह झालेला असून त्यांची पत्नी सोनम पांचाळ ही ३ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शौचासाठी घराबाहेर गेली होती. बराच वेळ झाली तरी ती घरी परतली नाही, तेव्हा घरच्यांनी परिसरात शोधाशोध केली.

Title Name
दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांच्यावर
विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

अखेर दुपारी तीनच्या सुमारास गावालगत असलेल्या पंडीत नरहर वाणी यांच्या विहीरीत सोनमचा मृतदेह आढळून आला. प्राप्त माहिती नूसार सोनम ही नेहमी ताण-तणावात असायची. गेल्या वर्षी तिने अतिप्रमाणात गोळ्या सेवन करून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले होते. सुदैवाने चाळीसगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये वेळीच औषधोपचार झाल्याने सुदैवाने ती वाचली होती. याबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार धर्मराज पाटील हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com