रेकार्डवरील गुन्हेगाराने बहिणीच्याच घरी केली चोरी

एमआयडीसी पोलिसांनी संशयित भावाच्या आवळल्या मुसक्या, बनावट चावीने लांबविला होता ऐवज
रेकार्डवरील गुन्हेगाराने बहिणीच्याच घरी केली चोरी

जळगाव - Jalgaon

शहरातील सिंधी कॉलनी (Sindhi Colony) येथील पवन हिरालाल लालवाणी (वय-३२) यांचे घर बनावट चावीचा वापर करून चोरट्याने फोडून घरातील कपाटातून सोन्याचे दागिने (Gold jewelry) आणि रोकड असा एकुण ५१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान लालवाणी यांच्या शालकानेच घर फोडल्याचे समोर आले असून बहिणीचे घर फोडून मुद्देमाल लांबविणार्‍या भारत अनिल कुकरेजा वय २९ रा. दौलतनगर जळगाव यास संशयित भावास गुरुवारी (MIDC Police) एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला उद्या शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

रेकार्डवरील गुन्हेगाराने बहिणीच्याच घरी केली चोरी
नमकीन विक्रेत्याला मारहाण करणार्‍या दोघांना अटक

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी यांना पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी त्यांच्या परीवाराला बाबत माहिती विचारली असता त्याने त्याचा शालक भारत अनिल कुकरेजा हा जळगाव शहरात राहत असल्याबाबतची माहिती दिली होती. तो पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याने सदरचा गुन्हा केला असावा असा पोलिसांना संशय होता. गुन्हा झाल्यापासून तो पसार होता. तो उल्हासनगर पुणे येथे गेला होता. तो गुरुवारी जळगाव शहरात आल्याबाबत ची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यावर संशयित भारत यास राहत्या घरून सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सचिन मुंडे, गोविंदा पाटील, सचिन पाटील यांच्या पथकाने अटक केली आहे. त्याने सदरचा गुन्हा कबूल करून गुन्ह्यातील लॉकेट त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com