बनावट दारू, दूधाचा कारखाना केला उद्‌ध्व‌स्त
जळगाव

बनावट दारू, दूधाचा कारखाना केला उद्‌ध्व‌स्त

अमळनेर शहरातील ढेकू रोड वरील घटना

Rajendra Potdar

अमळनेर - प्रतिनिधी Amalner

शहरातील ढेकू रोड वरील योगेश्वर कॉलनीत बनावट दारू व दूधाचा कारखाना पोलीसांनी उदध्वस्त करित बनावट दारूसह रसायन व दूध बनविण्याचे मशीनसह ३ लाख ११ हजार ८४० रूपयांचा माल हस्तगत केला असून लोंढवे येथील पती पत्नीसह अन्य एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गून्हे शाखेच्या पथकासह स्थानिक पोलीसांनी संयूक्तरित्या हि कार्यवाही केली आहे विजय अमृत पाटील रा लोंढवे ता अमळनेर हाच या बनावट कारखाना चालवून दूधाची विक्री करीत होता.

यापूर्वी देखील त्याचे लोंढवे गावी बनावट रसायन यूक्त दूधाचा कारखाना चालवित होता त्यावेळी त्याचेवर कार्यवाही करण्यात आली होती परंतू काही दिवसात त्याने पून्हा हा गोरख धंदा सुरू करून जनतेच्या आरोग्याशी खेळ सूरू ठेवला गुन्हे शाखेचे पो नि बापू रोहम व अमळनेरचे पो नि अंबादास मोरे यांचे समवेत वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली हि कार्यवाही झाली त्यांचे सोबतच्या पथकाने अत्यंत सावधगीरी बाळगत हि कामगीरी यशस्वी केली यावेळी पीएसआय सुधाकर लोहरे हे कॉ दिपक विसावे रामचंद्र बोरसे नारायण पाटील कैलास पाटील पो कॉ डॉ शरद नाईक दिपक माळी भटूसिंह तोमर रविंद्र पाटील हितेश चिंचोरे मनोज दूसाने दिपक पाटील दिपक शिंदे परेश महाजन महिला पोलीस रेखा ईशी यांचा समावेश होता.

यावेळी पोलीसांनी छापा मारला असता या ठिकाणी मँकडॉल कंपनीचे बनावट दारूचे ६४ हजार ८०० रपयांचे ४३२ बाटल्या ,आय बी कंपनीच्या १ लाख १४ हजार २४० रूपयांच्या ८१६ बॉटल १५ हजार किंमतीचे २०० लीटर रसायन १० हजार ५०० रूपांचे १०५ लीटर स्पिरिट १५ हजार किंमतीचे बनावट दूध बनविण्याचे मशिनसह ८५ हजाराच्या २ मोटर सायकली दूधाचे कँन व ईतर मूद्देमाल असा ३ लाख ११ हजार ८४० रूपयांचा माल हस्तगत करून विजय अमृत पाटील रा लोंढवे व शिवाजी गंगाराम पाटील रा तांबेपूरा या दोघांना अटक केली आहे तर तिसरी आरोपी म्हणून विजयची पत्नी सिमा पाटील यांचे विरूध्द रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते या कार्यवाहीने पोलीसांचे कौतूक होत आहे

Deshdoot
www.deshdoot.com