जळगाव : कारची विजेच्या खांबाला धडक

जखमी तरुणाचा मृत्यू
जळगाव : कारची विजेच्या खांबाला धडक

जळगाव | प्रतिनिधी

औरंगाबाद महामार्गावरील राका फर्निचर समोरील विजेच्या खांबाला भरधाव कारने दिलेल्या धडकेतील जखमी तरुणाचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्याच्या सोबतच्या दुसर्‍या जखमी तरुणावर उपचार सुरू आहे.

अजिंठा रोडवरील राका फर्निचर समोरील समोरील विजेच्या खांबाला कार (क्र.०२ बीजी ३०७८) ने धडक बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास धडक दिली होती. यात कारने तीन, चार पलटी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले होते. या अपघातात कारचालक ज्ञानेश्वर एम.चव्हाण (वय २० सुप्रीम कॉलनी) आणि प्रशांत प्रकाश नायर (वय २३, अयोध्यानगर) जखमी झाले.

या अपघातामधील गंभीर जखमी प्रशांत नायर याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तर ज्ञानेश्‍वर चव्हाण याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. तपास कॉन्स्टेबल अतुल पाटील करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com