जळगाव : विहिरीत आढळला वृद्धाचा मृतदेह
जळगाव

जळगाव : विहिरीत आढळला वृद्धाचा मृतदेह

कोल्हे हिल्स परिसरातील घटना

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी

कोल्हे हिल्स परिसरामधील एका विहिरीत लक्ष्मण धोंडू सोनवणे (वय ६२, रा. लक्ष्मीनगर) यांचा शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला

तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश चव्हाण, सतीश हाळनोर, उमेश भांडारकर, विलास पाटील, विजय दुसाने आदी घटनास्थळी पोहचले.

पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढला. काही वेळाने मयताची ओळख पटली. लक्ष्मण सोनवणे यांचे मानसिक संतुलन खालावले होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com