एरंडोल - Erandol

राज्य शासनाचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

त्यांचा मृतदेह पळासदळ शिवारात आढळून आला असून ते गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते.

ते सोमवारी गालापूर येथील शाळेत गेले असता घरी परत आले नसल्याची माहिती समोर येत आहे. किशोर पाटील व त्यांची पत्नी हे दोघंही शिक्षक आहेत. तसेच ते शिक्षक संघटनेतही पदाधिकारी आहेत.

त्यांनी ऑनलाईन शिक्षणासह आदिवासी वाड्यावरील विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसह नवनवीन उपक्रम राबवत होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून त्यांच्या मृत्युमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात असून पोलीस तपास करत आहेत.