जळगाव : गाडगे तलावात तरूणाचा मृतदेह आढळला
जळगाव

जळगाव : गाडगे तलावात तरूणाचा मृतदेह आढळला

एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

शहरातील गाडगे तलावाच्या काठावरील पाण्यात आज बुधवारी सकाळी 10.50 वाजेच्या सुमारास एका तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरूणाची ओढख पटली असून हा तरूण शहरातील नितीन साहित्या नगरातील रहीवाशी असून अमोल अधिकार पाटील (वय 20) असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताची ओळख पटली पटली असून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यता आला आहे.

या घटनेबाबत तरुणाच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तरुणाचा मु्तदेह बघून नातेवाईकांनी आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com