वराड येथील तरुणाचा मृतदेह तापी नदीकाठी  आढळला
जळगाव

वराड येथील तरुणाचा मृतदेह तापी नदीकाठी आढळला

तरुणाच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत

Ramsing Pardeshi

जळगाव | प्रतिनिधी

चोपडा तालुक्यातील वराड येथील एका तरुणाचा मृतदेह भोकर (ता.जळगाव) येथील तापी नदीच्या काठावर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आढळला. हा तरुण भोकर परिसरात कशासाठी आला आणि त्याचा मृत्यू कसा झाला? याबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

वराड येथील मुकेश लक्ष्मण खराटे (वय ३०) या विवाहित तरुणाचा मृतदेह भोकरजवळील नदीच्या किनार्‍यावर आढळला. याबाबत पोलीस पाटील हेमलता पवार यांनी तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा केला. तरुणाची ओळख पटल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. तरुणाची ओळख पटताच नातेवाईकांनी आक्रोश केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदन झाले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर जखमा, व्रण नसल्यामुळे घातपात नसावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. परंतु, या घटनेचे कारण पोलीस शोधत आहेत. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कदीर तडवी करीत आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com