अखंड मूल्याधिष्ठीत वर्तन गुणवंत विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम परतावा

डॉ. कलाम पुस्तक भिशीअंतर्गत गुणगौरव सोहळ्यात नीळकंठ गायकवाड यांचे प्रतिपादन
अखंड मूल्याधिष्ठीत वर्तन गुणवंत विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम परतावा

जळगाव jalgaon| प्रतिनिधी

गुणवंत विद्यार्थ्यांनी अखंड मूल्याधिष्ठीत वर्तन Uninterrupted value-based behavior by students ठेवणं हा मायबापांच्या संस्कारांचा Rites अपत्यांनी दिलेला सर्वोत्तम परतावा असे भावोद्गार निवृत्त शिक्षण उपसंचालक नीळकंठ गायकवाड Neelkanth Gaikwad यांनी काढले.भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी Bharat Ratna Dr. A. P. J. Abdul Kalam Pustak Bhishi तर्फे भिशी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा शाहूनगर जळगाव येथील अथर्व पब्लिकेशनच्या Atharva Publications कार्यालयात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षण उपसंचालक आप्पासाहेब निळकंठ गायकवाड होते. प्रमुख अतिथी सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, डॉ विजय बागुल उपस्थित होते. पुढे बोलतांना गायकवाड म्हणाले की, गुणवंतांनी स्वतःला शाबूत ठेवण्यासाठी स्वतःवर स्वतःच नैतिक बंधन घातली की ऊर्वरीत रिक्त अवकाशात मुक्तपणे पोहून जीवनानंद घेता आला पाहीजे. रोज स्वतःला नव्या रुपात सिद्ध करा यासाठी रोज अद्ययावत प्रचंड वाचन करणे अपरिहार्य असल्याचे गायकवाड म्हणाले.

प्रारंभी पुस्तक भिशी जिल्हाप्रमुख संयोजक विजय लुल्हे यांनी भिशी स्थापनेची उद्दिष्ट्ये व राबविलेली शैक्षणिक , सांस्कृतीक , सामाजिक , आरोग्य व पर्यावरणात्मक उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर सिद्धार्थ नेतकर, साहित्यिक डॉ. मिलींद बागुल, मुख्याध्यापक नितीन धांडे, विजय बागुल यांनी मनोगत व्यक्त करीत मार्गदर्शन केले. सत्कारार्थी पाल्यांच्या पालकांतर्फे सुदाम बडगुजर यांनी मनोगत व्यक्त करतांना मूल्य संवर्धनाचे महत्व सांगितले. सत्कार प्रसंगी अथर्व प्रकाशनाचे संचालक तथा प्रकाशक युवराज माळी , कुमूद प्रकाशनाच्या संचालिका संगिता माळी, पत्रकार दीपक महाले, दीपक साळुंके, शरद महाजन उपस्थित होते. सुत्रसंचालन विजय लुल्हे व आभार प्रदर्शन एस . एस . बडगुजर यांनी मानले.

गुणवंत पाल्यांचा गौरव

इयत्ता दहावीमध्ये ८९.४ टक्के गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश मिळवलेली ओरियनचे विद्यार्थीनी कुमुद माळी, प्रफुल्ल बडगुजर याने ९६.१ टक्के गुण मिळविणार्‍या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com