अस्वलाने केला शेतकऱ्यावर हल्ला ; प्रकृती गंभीर

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
अस्वलाने केला शेतकऱ्यावर हल्ला ; प्रकृती गंभीर

भुसावळ - प्रतिनिधी Bhusawal

मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनक्षेत्रातील अस्वलाने एका शेतकर्‍यांवर हल्ला केल्याची घटना वायला परिसरात घडली. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील वायला येथील प्रल्हाद सोपान इंगळे शेतकरी हे वायशा शिवारातील शेतात काम करत असतांना गुरुवारी यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला करुन गंभीर जखमी केले.

वडोदा वनक्षेत्र १२ हजार हेक्टर एवढे क्षेत्र असून या क्षेत्रात अनेक वन्य प्राणी आजही मोठ्या प्रमाणात वास्तव्यात आहेत. शेती पिकांची देखील वन्यप्राणी नासधूस करत असतात याकडे मात्र वनविभाग नेहमी दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकर्‍याला तातडीची मदत मिळण्याची मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com