
जळगाव - Jalgaon
ग. स. सोसायटीच्या सत्ताधारी व विरोधीगटांच्या १४ संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर संचालक मंडळ अल्पमतात आले होते.
मंगळवारी संचालक मंडळ बरखास्त करण्यात येऊन प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. आज बुधवार दि.३ रोजी सकाळी ११ वाजता प्रशासक व्ही.एम.गवळी, प्रशांत विरकर, भाऊसाहेब महाले यांनी पदभार स्वीकारला आहे.