मुलांनी केली जन्मदात्याची हत्या ; जागेवरच ठोकल्या आरोपींना बेड्या

दिवसाढवळ्या झालेल्या घटनेने जिल्हा हादरला
मुलांनी केली जन्मदात्याची हत्या ; जागेवरच ठोकल्या आरोपींना बेड्या

जळगाव - Jalgaon

जन्मदात्याचे ऋण कधीडी फिटत नाहीत मात्र या वडील आणि मुलगा या नात्याला काळीमा फासणारी घटना आज जळगावात दिवसाढवळ्या घडली. पोटच्या दोन्ही मुलांनी जन्मदात्या बापाची हत्या केल्याचे घटनेने खळबळ उडाली.

मयत बापाचे प्रेमसिंग अभिसींग राठोठ (वय ५०) असे नाव असून त्यांना दोन मुले, दोन मुली आहेत. ते निमखेडी शिवार जळगाव येथे राहत असून आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास दोन्ही मुले दिपक व गोपाळ यांनी वडीलांना दवाखान्यात जाण्यास सांगितले मात्र प्रेमसिंग यांनी नकार देत यावरून वाद झाला. प्रेमसिंग यांनी मुलांवर चाकू उगारला असता तोच चाकू हिसकावून मुलांनीच वडिलांवर वार करून ठार केल्याची निर्दयी घटना घडली.

जागेवरच ठोकल्या बेळ्या

सदर घटनास्थळी मारेकरी मुले हजर असल्याने पोलीसांनी तत्काळ त्यांना जागेवरच बेड्या ठोकल्या. घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अप्पर पो.अ. चंद्रकांत गवळी, सहा.पो.अ.कुमार सिंथा यांनी भेट दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com