संकटग्रस्तांना वाचविण्याची क्षमता युवकांमध्ये आधिक - आ.मंगेश चव्हाण

य.ना.चव्हाण महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन शिबीरात प्रतिपादन
संकटग्रस्तांना वाचविण्याची क्षमता युवकांमध्ये आधिक - आ.मंगेश चव्हाण

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

चांगले संस्कार हे माणसाला नेहमी यशाकडे नेतात. आपत्ती काळात संकटग्रस्तांना आपत्तीतून बाहेर काढणे खूप मोठे आव्हान असते. हे आव्हान पेलण्याची क्षमता युवकांमध्ये असते. बघणारे खूप असतात पण मदतीचा हात पुढे करून सहकार्य करणार्‍यांची संख्या खूप कमी असते. आपण जिल्ह्यातून आलेले सर्व स्वयंसेवक नक्कीच भारतीय समाजाला मदतीचा, सहकार्याचा हातभार लावून आदर्श समाज निर्माण कराल यात शंका नाही, अशी अपेक्षा आमदार मंगेश चव्हाण MLA Mangesh Chavan यांनी व्यक्त केली.

शहरातील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना आणि नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय Y.N. Chavan College चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी ते बोलत होते. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.संजय गोपाळराव देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर भीवराव पाटील हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. डॉ.पंकजकुमार नन्नवरे, आमदार मंगेश चव्हाण MLA Mangesh Chavan, संस्थेचे सहसचिव संजय रतनसिंह संस्थेचे संचालक सुधीर पुंडलिक पाटील, अविनाश फकिरराव देशमुख, प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव. उपप्राचार्य डॉ. एस.डी. महाजन, उपप्राचार्या प्रा.डॉ. यु.आर मगर, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. डी. देशमुख प्रा.सुरेश कोळी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलतांन आमदार मंगेश चव्हाण MLA Mangesh Chavan म्हणाले की, चाळीसगाव परिसराला अतिवृष्टीने व महापुराने वेढले. पशुधन ,शेती, दुकाने, घरे व इतर मालमत्ता यांचे अतोनात नुकसान झाले. परिसरात रोगराई पसरू नये, जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी बघणार्‍यांपेक्षा मदत व सहकार्य करणार्यांची खरी गरज आहे. आपल्या हातून चार दिवसात समाज उपयोगी एक चांगले विधायक कार्य घडेल याची मला खात्री आहे आणि यशस्वीतेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात.

डॉ. संजय गोपाळराव देशमुख यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आपल्या महाविद्यालयावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे. जबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य आपल्याला पार पाडायचे आहे. कोरोनाचे संकट आणि अतिवृष्टीचे संकट यांना आपल्याला सामोरे जायचे आहे. स्वयंसेवक नक्कीच आपत्ती काळात संकटग्रस्तांना मानसिक आधार देतील व सहकार्य करतील त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन व शिबीर यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

शिबिर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष डॉ.एम. बी. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, विद्यापीठाने आपत्ती व्यवस्थापनात मदत व पुनर्वसन शिबिराच्या आयोजनाची जबाबदारी आपल्या महाविद्यालयावर सोपविली ही एक चांगली संधी मानून नैसर्गिक आपत्ती काळात आपल्या तालुक्यावर जे संकट आले आहे, त्यामुळे बरेच लोक बेघर झाले आहेत, कोणाची मालमत्ता नष्ट झाली, कोणाची शेती वाहून गेली तर कोणाची वित्तहानी झाली, पशुधनही मेले अशा परिस्थितीत संकटग्रस्तांची सेवा करण्याची, त्यांना धीर देण्याची व त्यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही ही काळजी व सहकार्य आपल्याला या चार दिवसात करायचे आहे.

या संकटावर मात करण्याचे प्रयत्न आपण करावे. तसेच संस्थेकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. एस. आर.जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ.एस.डी. महाजन, उपप्राचार्य प्रा.डॉ.यु. आर. मगर, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी डी देशमुख यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. डॉ.पंकजकुमार नन्नवरे, प्रा. डॉ. ए. एल. सूर्यवंशी, प्रा. डॉ. आर. पी.निकम, प्रा.मंगला सूर्यवंशी आदि परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा.डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर. पी. निकम यांनी केले. तर आभार प्रा.मंगला सूर्यवंशी यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com