हतनुर प्रकल्पाचे 36 दरवाजे उघडले
जळगाव

हतनुर प्रकल्पाचे 36 दरवाजे उघडले

82 हजार 417 क्युसेक पाण्याचा विसर्ग

Rajendra Patil

नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पापैकी हतनुर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परिसरात आतापर्यंत सुमारे 60 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पाण्याच्या आवक मुळे प्रकल्पाचे 36 दरवाजे उघडण्यात आले असून 82 हजार, 417 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्याच्या सरहद्दीला लागून असलेल्या शेजारील मध्यप्रदेश राज्यात तसेच हतनुर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीमुळे होत आहे.

प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पाण्याच्या आवकेमुळे पातळीत वाढ होत आहे. आतापर्यंत गेल्या चोवीस तासात 60 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आले असून 121.43 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. परिणामी हतनूर प्रकल्पाचे 36 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत प्रकल्पातून 82 हजार,121 क्यूसेक वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदी काठावरील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com