24 वर्षीय विवाहितेने घेतला गळफास

सटाणा जि.नाशिक येथील आहे माहेर
24 वर्षीय विवाहितेने घेतला गळफास

पारोळा - प्रतिनिधी Parola

येथील के.आर.नगर मधील रहीवाशी असलेल्या 24 वर्षीय विवाहितेने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि.18 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मुरलीधर मुकुंदा वाणी (वय 53) रा. स्वामी नारायण नगर, पारोळा यांनी पारोळा पोलिसात दिलेल्या खबरीनुसार धनश्री योगेश शेंडे (वय 24) हिने स्वत: च्या राहते घरी दि18 रोजी दुपारच्या सुमारास स्वत: गळफास लावुन घेतली असल्याची घटना नातेवाईक यांना कळाल्याने तिस उपचारासाठी कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डाँक्टरांनी तपासुन दुपारी 1.30 वाजता मयत घोषित केले.

याबाबत पारोळा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन तपास हवलदार किशोर पाटील करित आहे. दरम्यान विवाहितेचे माहेर हे सटाणा जि.नाशिक येथील आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com