जिल्ह्याचे तापमान 44 अंशावर

वाढत्या तापमानवाढीमुळे जळगावकरांना उकाडा असह्य
जिल्ह्याचे तापमान 44 अंशावर

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या अनेक दिवसांपासून वाढत्या तापमानवाढीमुळे जिल्ह्याच्या तापमानात देखील बदल होत आहे.

दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान वाढले असून आज जिल्ह्याचे तापमान 44 अंश इतके नोंदविण्यात आले. त्यामुळे सकाळपासून होणार्‍या उकाड्यामुळे जळगावकर प्रचंड हैराण झाले आहे.

देशात सर्वात हॉट सिटी म्हणून जळगावची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वी जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान हे 48 अंश सेल्सियसपर्यंत नोंद झाली असल्याने तापमानवाढ आणि जळगाव असे एक समीकरणच निर्माण झाले आहे.

यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांना उकाडा सहन करावा लागत आहे.

परंतु काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट देखील झाली होती. परंतु आठवड्याभरापासून जिल्ह्यच्या तापमानाने पुन्हा मुसंडी मारल्याने जिल्ह्याचे तापमान 40 अंशापेक्षा अधिक नोंदविले जात आहे.

यंदाची सर्वाधिक नोंद

जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सकाळपासून उन्हाच्या तीव्र झळा जळगावकरांना सोसाव्या लागत आहे. आठवड्याभरपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असल्याने आज यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतच्या जिल्ह्यातील कमाल 44 तर किमान 25 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद हवामान तज्ञांनी केली आहे.

सकाळपासूनच सोसावे लागताय रणरणत्या उन्हाचे चटके

सकाळी 10 वाजेपासून तापमानाचा पारा वाढत असल्याने या वाढत्या तापमानामुळे जणू सुर्य आग ओकत असल्याने जळगावकरांना सकाळी 10 वाजेपासून रणरणत्या उन्हाचे चटके सोसावे लागत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com