शिक्षक आता शिकवतील घरुनच अभ्यासक्रम

शिक्षकांना दिलासा ; वर्क फ्रॉम होमचे यांचे आदेश पारीत
शिक्षक आता शिकवतील घरुनच अभ्यासक्रम

जळगाव - Jalgaon :

जिल्ह्यात कोविड महामारीचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने दि.३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषीत केला असून कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

याकाळात शाळा, महाविदयालये बंद ठेवाव्यात, असे निर्देश देण्यात आले होते. मात्र शिक्षक उपस्थितीबाबत स्पष्ट आदेश नसल्याने संभ्रम होता.

दरम्यान शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. आपतकालीन सेवेसाठी घेतलेले शिक्षक वगळून इतरंाना शिक्षकांना आता घरी राहूनच काम करण्याची मुभा मिळाली असून आज शुक्रवारी वर्क फ्रॉम होमचे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यातर्फे पारित करण्यात आले आहे.

कोविड महामारीचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषीत केला असून कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिक्षकांच्या उपस्थितीबाबत कुठलेही आदेश नव्हते. तसेच करोनाच्या पार्श्‍वभूमिवर शिक्षकांनाही वर्क फ्रॉमची मुभा द्यावी यासाठी शिक्षक सेनेने पाठपुरावा केला होता. तसेच स्पष्ट आदेश काढण्याची विनंती केली होती.

शिक्षण उपसंचालक, नाशिक यांनी जळगांव, धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्हयाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पत्र काढून लॉकडाऊन काळात शिक्षक उपस्थितीची सक्ती न करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच शिक्षण उपसंचालक यांच्या कालच्या पत्रानुसार जि.प.जळगांवचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पत्र निर्गमीत करुन कोविड - १९ आपतकालीन सेवेसाठी घेतलेले शिक्षक वगळून इतर शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करण्यास मुभा दिली आहे.

या आदेशाबद्दल शिक्षकसेनेचे पदाधिकारी नरेंद्र सपकाळे,संदीप पवार,नाना पाटील, ईश्वर सपकाळे, सुनिल चौधरी, राधेशाम पाटील, राजेश जाधव यांनी शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांचे आभार मानले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com