जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्यांंनी नेमलेल्या पथकाने 18 फेबु्रवारी रोजी रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील जि.प.शाळांना अचानक भेट दिली. यावेळी मुक्ताईनगर तालुक्यातील दोधे येथील शाळा बंद असल्याची आढळून आली.

शाळा बंद ठेवल्याप्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना जागीच निलंबित करण्याचे आदेश जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एस.पाटील यांनी दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले. कोरोना सदृश्यकाळात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जि.प. शाळांमध्ये शिक्षक वेळेवर येत नाही. तसेच विद्यार्थ्यांअभावी शाळा नावालाच उघडविण्यात येतात.

अशा तक्रारी असल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांंनी नेमलेल्या पथकाने 18 फेबु्रवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भेट दिली असता मुक्ताईनगर तालुक्यातील दोधे येथील जि.प.शाळा बंद होती.

शाळा बंद ठेवल्याप्रकरणी मुख्याध्यापक किशोर चौधरी आणि शिक्षक भूषण सोनवणे यांना जागीच निलंबित करण्याचे आदेश जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एस.पाटील यांनी दिले.

दरम्यान, रावेर तालुक्यातील मोरझिरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला पथकाने भेट दिली असता त्याठिकाणी स्वाक्षरी करून तीन शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले. यात शिक्षक नंदकिशोर कदम, गोकुळ देवरे, रुपाली कृष्णा धनगर या तीन शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी शिक्षण विभागाला दिले आहे.