भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal -

शहराजवळील कंडारी येथील नागसेन कॉलनीतील रहिवासी ३० वर्षिय शिक्षिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या घेतल्याची घटना दि. २४ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

येथील एम.आय. तेली शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत अंजली किसन वाघमारे (वय ३०, रा. नागसेन कॉलनी, कंडारी) यांनी राहत्या घरी छताच्या कडीला दोर बांधून गळफास घेतला. याबाबत गौरव विजय सुरवाडे यांचया खबरीवरुन अकस्मात मृत्यृची नोंद करण्यात आली.तपास पीएसआ विनोदकुमार गोसावी करीत आहे.

दरम्यान, शनिवारी दुपारी शहरातील हनुमान नगरातील ५ वीचा विद्यार्थी दीपांकर भंगाळे याचा झोका खेळत असतांना गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. लागोपाठ दोन दिवसात ही दुसरी घटना असल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.