जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

महिला व बालकल्याण विभागाने सुरु केलेल्या तरंग सुपोषित महाराष्ट्राचा डिजीटल प्लॅटफॉर्म सुरु केला आहे.

जिल्ह्यातील 3 हजार 640 अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांच्या माध्यमातून ‘तरंग सुपोषित’ योजना घराघरात पोहचविण्याचे काम सुरु आहे. सुदृढ बालक, स्तनदा माता यांच्या पर्यंत ही योजना व्हॉटस्अॅपव्दारे पोहचविण्यात जळगाव जिल्हा राज्यात अव्वलस्थानी आला आहे. व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून 40 हजार 909 जणांनी लाईक केले आहे. तर 9 हजार 931 जणांनी कॉलव्दारे संदेश दिला आहे.

340 अंगणवाड्यांमधून काम

जिल्ह्यातील 3640 अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आयव्हीआर प्रणालीवर आधारीत ऑनलाईन संवाद साधण्याचे काम सुरु आहे. राष्ट्रीय पोषणमध्ये सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र ध्येय साध्य करण्यासाठी ‘तरंग सुपोषित’ हा डिजीटल उपक्रम चित्रिफितीच्या माध्यमातून घरोघरी पोहचविण्याचे काम अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका करीत आहे. यासाठी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर.आर.तडवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

चित्रफितीतून प्रबोधन

पोषण विषयक महिती चित्रफितीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका घरोघरी पोहचविण्यासाठी व्हॉटस्अॅपचा उपयोग करीत आहे. या उपक्रमाला ग्रामीण भागातील नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद देत व्हॉटस्अॅपला लाईक करीत आहेत. त्यामुळे राज्यातील 36 जिल्ह्यांमधून जळगाव जिल्हा पहिल्या अव्वलस्थानी राहीला आहे. केलेल्या सर्वेक्षणात जळगाव प्रथम तर पुणे व्दितीय सातारा तृतिय, नांदेड चौथ्या स्थानी, ठाणे जिल्हा पाचव्या क्रमांकावर राहिला आहे. अशी माहिती जि.प. प्रशासनाने दिली.