तलाठी सुभाष वाघमारे यांचा होत आहे गौरव

सचिवपदी झाली निवड
तलाठी सुभाष वाघमारे यांचा होत आहे गौरव

शेळावे, ता.पारोळा - Parola

पारोळा तलाठी संघटनेची नुकतीच नुतन कार्यकारीणी जाहीर झाली, यात तलाठी सुभाष वाघमारे यांची...

तालुका सचीवपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. पारोळा तहसील कार्यालय येथे दि.31 रोजी दुपारी ३.३० वाजता मंडळ अधीकारी जि.एस.काटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यामध्ये पारोळा तालुका संघटना यांची नवीन कार्यकारिणी नियुक्त केली. त्यावेळी अध्यक्षपदी पि.बी.शिंद, उपाध्यक्षपदी ए.एम. शेळके व सचीवपदी खेडीढोक येथील तलाठी कार्यतत्पर सुभाष विठ्ठल वाघमारे याची सचीवपदी निवड करण्यात आली.

तसेच सहसचिव म्हणून दिलीप नेरकर यांची निवड करण्यात आली व सल्लागार नायब तहसीलदार शिंदे संगाय व जिल्हा प्रतिनिधी म्हणून शांताराम पाटील मंडळ अधीकारी व महीला प्रतिनिधी म्हणून माधुरी वेरेळकर व कोषाध्यक्षपदी मोनीका मोरे यांची निवड करण्यात आली. त्यावेळी निशिकांत पाटील, गौरव लांजेवार, सचीन हाडुळे, गजानन बहुरे, माणिकराव बोपचे, जोशी आप्पा, पन्नाडकर आप्पा, काळे आप्पा, भुषण बावीस्कर, गीतांजली पाटील, हर्षल लासुरकर, अरूण पाटील, वर्षा काकुसते, कल्पना खाननदे, माया पाटील आदी उपस्थित होते. सुसंचालन आदर्श तलाठी निशिकांत पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन तलाठी सुभाष वाघमारे यांनी मानले. या निवड झाल्याबद्दल एरंडोल येथील तलाठी अतुल तागडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com