वरणगांवात डेग्यूंच्या आजाराची लक्षणे

नगरपरिषद सुस्त , नागरीक त्रस्त : उपाय योजनांची आवश्यकता
वरणगांवात डेग्यूंच्या आजाराची लक्षणे

वरणगाव Varangaon। प्रतिनिधी

शहराच्या विस्तारीत भागातील नाल्यांची साफसफाई Cleaning of nallas केली नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले आहे. तसेच नगर परिषदेकडुन कुठल्याही प्रकारची डास नाशक फवारणी Mosquito repellent spray केली जात नसल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रार्दूभाव वाढला आहे. यामुळे सुस्त नगर परिषद प्रशासनाने Municipal Council Administration उपाय योजना Measure plan करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुकीमुळे शासनाने वरणगांव नगर परिषदेचा कारभार दोन वर्षापासून प्रशासकाच्या हाती दिला आहे. मात्र, प्रशासकाचे शहरातील नागरीकांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. यामध्ये पावसामुळे रस्त्यांची झालेली बिकट अवस्था तर दुचाकी वाहनधारकांच्या किरकोळ अपघाताला कारणीभुत ठरत आहे.

तसेच शहरातील शिवाजी नगर, प्रतिभा नगर, बसस्थानक चौक अशा मध्यवस्तीतील नाल्यामध्ये वसाहतीमधील सांडपाण्याच्या गटारीतील पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, या नाल्यांची पावसाळ्यापुर्वी पाण्याचा निचरा होण्यासाठी साफसफाई केली नाही.परिणामी नाल्यात साचलेल्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असुन डासांचाही उपद्रव वाढला आहे. इतकेच नव्हेतर नाल्याच्या दोन्ही बाजुला विविध प्रकारची विषारीजन्य गवते उगवली आहेत.

यामुळे नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असुन डासांच्या उपद्रवामुळे नागरीक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तर काही रुग्णांमध्ये डेंग्युची लक्षणे आढळून येत असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात वेळीच उपचार केले जात असल्याने परिस्थिती आटोक्यात येत आहे.

मात्र, सुस्त असलेल्या नगर परिषद प्रशासनाकडुन नागरीकांच्या आरोग्य हितासाठी कुठल्याही प्रकारच्या उपाय योजनांना अथवा डास नाशक फवारणीला प्राधान्य दिले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहराच्या नविन विस्तारीत भागात नगर परिषदेच्या माध्यमातुन काँक्रीटीकरणाचे रस्ते तयार करण्यात आले आहे. मात्र, या रस्त्यांची अवघ्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने या रस्त्यावर पाण्याचे डबके साचत आहेत. तर काही भागातील रस्ते काँक्रीटीकरणामुळे अपूर्णावस्थेत असल्याने या भागातील नागरीकांना चिखलमय रस्त्यावरुन मार्गक्रमण करावे लागत असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. याबाबत स्थानिक रहीवाश्यांनी नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार रस्ते दुरुस्तीची मागणी केली.

मात्र, सुस्त नगर परिषद प्रशासन दाद पुकार घेत नसल्याने प्रभाग क्रं.9 मधील शिवाजी नगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांनी पुढाकार घेवुन स्वखर्चातुन चिखलमय रस्त्यावर पाच ते सहा डंपर मुरुम टाकून या भागातील नागरीकांचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे.

बसस्थानक चौकात गंभीर परिस्थिती

नेहमी वर्दळीच्या असलेल्या बसस्थानक चौकात फळ, भाजीपाला विक्रेते, मोकाट गुरे, प्रवाशी वाहतुक करणारे व बेशिस्त पार्कींग करणार्‍या वाहनधारकांनी एक प्रकारे तालीबान्यांसारखा कब्जा मिळवला असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

त्यातच पावसाचे पाणी या भागातील खड्डेमय रस्त्यात साचत असल्याने या चौकातुन मार्गक्रमण करणार्‍या पादचार्‍यांना थोडा वेळ विचार करूनच पुढचे पाऊल उचलावे लागत असुन बसस्थानक चौकात श्वास कोंडी होत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

मात्र, याकडे कुणालाही लक्ष द्यायला वेळ नसल्याने सर्वसामान्य नागरीकांमध्ये नगर परिषद व पोलीस प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com