आसोदा येथे तरुणावर तलवार हल्ला

आसोदा येथे तरुणावर तलवार हल्ला

जि.प.सदस्य पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव - Jalgaon

तालुक्यातील आसोदा येथील तरूणाने जुन्या वादातून पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून जि.प.सदस्य पतीसह दोघांनी तरूणावर तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्या घटना शनिवारी दुपारी १ वाजता घडली. तालुका पोलीसात शनिवारी रात्री उशीरा जि.प.सदस्या पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय एकनाथ घुले (वय-३८) रा. ढंढोरे नगर, तरसोद रोड आसोदा ता.जि.जळगाव असे जमखी झालेल्या तरूणाचे नाव आहे. विजय घुले आणि त्यांच्या भावाला गावातील जितेंद्र बाबुराव देशमुख यांनी किरकोळ कारणावरून जीवेठार मारण्याची धमकी दिली होती. याची तक्रार विजय घुले यांनी यापुर्वी जिल्हापेठ पालीसात तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून जिल्हा परिषद सदस्या पल्लवी देशमुख यांचे पती रवी उर्फ जितेंद्र बाबुराव देशमुख सह योगेश डिगंबर कोल्हे आणि भरत बाळू पाटील सर्व रा. आसोदा ता.जि.जळगाव यांनी शुकवार १४ मे रोजी दुपारी १ ते १.१५ वाजेच्या सुमारास विजय घुले हे दुचाकीने घरी जात असतांना दुचाकी आडवून यांच्यावर तलवार हल्ला करून जखमी केले. तर लोखंडी रॉड आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. विजय घुले यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचार घेवून शनिवारी सायंकाळी विजय घुले यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक कल्याण कासार करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com