नात्यांचा जपला गोडवा

नात्यांचा जपला गोडवा

जळगाव jalgaon।

शहरातील शाळा, महाविद्यालयांसह सामाजिक संस्थांतर्फे रक्षा बंधन Raksha Bandhan मोठ्या उत्साहात साजरी Celebration करण्यात आली. विविध सामाजिक संघटनांनी Social organizations संपुर्ण देशवासीयांचे रक्षण करणार्‍या जवानांना तर काही महिला मंडळाने प्रत्येक सणाला आपल्या कुटूंबापासून दूर राहत इतरांना सोयी सुविधा देणार्‍या बस चालक व वाहकांसह रस्त्यावरील दिन दुबळ्यांना राखी बांधून सामाजिक एकोप्याचा संदेश message of social cohesion देत गोडवा जपला.

सैनिकांसोबत साजरी केली रक्षाबंधन

युवाशक्ती व स्टुडन्ट चॅरिटी फाऊंडेशनच्या युवतींतर्फे शहरातील एन.सी.सी. च्या मुख्यालय येथे जाऊन सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या वेळी देशाचे रक्षण करत असलेल्या सैनिकांना राखी बांधून, पेढा भरविला. हे सैनिक उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार, झारखंड, राजस्थान, उत्तराखंड, महाराष्ट्र, येथील आहे. या वेळी एन.सी.सी.चे सुभेदार मेजर कोमल सिंग, सुभेदार अजित कुमार, सुभेदार सुनील पालवे, हवालदार विक्रम सिंग, अनिल कुमार, शैलेंद्र कुमार, मुकेश कुमार.

युवाशक्ती फाऊंडेशन व स्टुडन्ट चॅरिटी फाऊंडेशनचे वैष्णवी खैरणार, विनिता पाटील, संस्कृती नेवे, वैष्णवी भांडारकर, नदाल मोदक, चाहत कटारिया, विराज कावडीया, अमित जगताप, सयाजी जाधव, उमेश देशमुख, यश भालशंकर आदी उपस्थित होते.

सेवाधर्म परिवार व नारीशक्ती सखी मंच

कर्तव्यदक्ष पोलीस बांधव आणि एसटी बस वाहक चालक बांधवान समवेत सेवाधर्म परिवार आणि नारीशक्ती सखी मंच तर्फे अनोखी रक्षाबंधन साजरी करण्यात आली. सणाला देखील कुटूंबापासून दूर राहून सेवा बजाविणार्‍या बस वाहक व चालक व पोलिस कर्मचार्‍यांसह रस्त्यावर राहणार्‍यांना देखील राखी बांधून रक्षा बंधन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

यावेळी नारीशक्ती सखी मंचच्या मनीषा पाटील, भावना चौव्हाण, ज्योती राणे, नेहा जगताप, रंजन पटेल, रेणुका हिंगू, माधुरी जावळे, सुमित्रा पाटील, सुरेखा पाटील, वंदना कोष्टी, अलका बागुल, योगिता बाविस्कर, आरती शिंपी यांनी सहभाग घेतला. सेवा धर्म परिवार अध्यक्ष चंद्रशेखर नेवे हे उपस्थित होते.

बालनिकेत विद्यामंदिर

रक्षाबंधन निमित्ताने बहिणीने भावाच्या तोंडावर मास्क बांधून दिल्या शुभेच्छा प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व नवीन माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन सणानिमित्त विद्यार्थ्यांचा राखी बांधणे तसेच भावाला मास्क देवून कोरोनापासून रक्षण करणे असा उपक्रम मुख्याध्यापक डॉ.रवींद्र माळी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला.

या उपक्रमात नर्सरी ते इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत बहिणींनी भावांचे औक्षण करून राखी बांधली आणि भावाने बहिणीला भेटवस्तू दिली. निलेश नाईक यांनी रक्षाबंधन सणाचे महत्व विषद केले. ऑनलाईन उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत निबंध स्पर्धा, राखी तयार करणे, रक्षाबंधनाची चित्रे काढून सादर केली.

सदर कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन राहुल धनगर यांनी केले. यशस्वितेसाठी नरेंद्र वारके, उज्ज्वला जाधव, वंदना नेहेते, रशिदा तडवी, राजेंद्र पवार, श्रीकांत पाटील, संगीता निकम, सुवर्णा सोनार, ज्योती सपकाळे, स्वाती याज्ञिक, भूषण बर्‍हाटे यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com