‘स्वच्छ भारत’चे तीनतेरा
जळगाव

‘स्वच्छ भारत’चे तीनतेरा

उद्दिष्ट गाठूनही लोटाबहाद्दरांची संख्या ‘जैसे थे’

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जिल्हयात 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान गंदगीमुक्त भारत अभियाना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्लॅस्टिक, सिंगल युज प्लॅस्टिक वर्गीकरण, श्रमदान, कचरा संकलन, परीसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता संदेश, वृक्षलागवड शालेय स्तरावर हगणदारीमुक्त गाव याविषयावर चित्रकला स्पर्धांचे आयोजन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र परीसर स्वच्छता आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

डिगंबर लोखंडे,जि.प.उपमुख्यकार्यकारी अधिकारी, स्वच्छता, पाणीपुरवठा विभाग.

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हयात तसेच राज्यात जनआरोग्य अबाधित रहावे, यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागात ग्राम स्वच्छता अभियानाची सुरूवात गेल्या 18ते 20वर्षापूर्वी 2 ऑक्टोबर 2000 पासून करण्यात आली. या अभियानांतर्गत स्वच्छ ग्रामपंचायत, अंगणवाडी,प्राथमिक शाळा परीसर अंतर्गत बक्षिसे देखिल 1 लाखापासून ते पंचवीस लाखांपर्यंत प्रदान करण्यात आली.त्यानंतर गेल्या सहा साडेसहा वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले.

या दोन्ही अभियांनांतर्गत अनुदान वाटप होऊन घरोघरी शौचालये, तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात आलीत. जिल्हयात ग्रामपंचायत स्तरावर 2019-20 अंतर्गत 43 कोटी 20लाख, 24 हजार तर नगरपालिका स्तरावर 70 कोटींच्या वर वैयक्तीक शौचालय बांधकामांतर्गत अनुदान वाटप करण्यात आले आहे. स्वच्छता अभियानाचे उद्दीष्ठ गाठले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे, परंतु असे असले तरी शहरासह तालुका तसेच ग्रामीण भागात रस्त्यांवर प्रातःविधी करणार्‍या लोटाबहाद्दरांची संख्या जैसे थेच आहे. अजूनही तालुका तसेच ग्रामीण भागात जातांना नाकाला रूमाल लावून जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्हयात गत 20 -21 वर्षापूर्वी ग्रामीण तसेच शहरी भागात देखिल सकाळी रस्त्याने जातांना नाकाला रूमाल बांधून आणि खाली मान घलूनच जावे लागत होते अशी स्थिती सर्वदूर होती. त्यामुळे हिवताप मलेरीया सारखे साथीचे आजारांचे मोठया प्रमाणावर पावसाळयाच्या दिवसात थैमान होते. यावर तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, संत तुकडोजी महाराज स्वच्छ पंचायत समिती, राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा परीषद यासह स्वच्छ अंगणवाडी, प्राथमिक शाळा असे अभियान राबवण्ययेवून सार्वजनिक शौचालयांचे बांधकामांना वेग आला. यासाठी व्यक्तीगत अनुदान देखिल ग्रामपंचायत स्तरावरच वाटप करण्यात आले.

43 कोटींचे आतापर्यंत अनुदान वाटप

जिल्हयात 2012मध्ये 5लाख 50हजार 140 कुटूंबाच्या च्या बेसलाईन सर्र्वेनुसार 3,89,833 कूटूंबाकडे वैयक्तीक शौचालय नसल्याचे दृष्टिपथात आले. सद्यस्थितीत 2019-20 अंतर्गत 36002 कुटूंबाकडील शौचालय प्रस्तावानुसार प्रत्येकी 12 हजार रूपये प्रमाणे 43कोटी 20लाख, 24हजार रूपये शौचालय बांधकाम अनुदानापोटी रकम वितरीत करण्यात आली आहे.

गुड मॉर्निंग पथकाला बाय-बाय

यात सन 2014 नंतर स्वच्छ भारत अभियान असे विशान स्वरूप देण्यात येवून शौचालयाच्या अनुदानात वाढ करण्यात आली. जिल्हा परीषदेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या कार्यकाळात तर जिल्हा परीषदेने स्वच्छता अभियांनांतर्गत रस्त्यावर प्रातःविधी करणार्‍या विरोधात गुलाबपुष्प देउन स्वागत करण्याचे अभियान राबवले होते. त्यानंतर मात्र जिल्हा परीषदेकडून ग्रामीण स्तरावर स्वच्छता अभियानाकडे दूर्लक्ष झाल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरत असून साथरोग प्रादूर्भावास आमंत्रणच दिले जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com