<p><strong>जळगाव- Jalgaon</strong></p><p>धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील तरूणीने गावातीलच तरूणासोबत प्रेम विवाह केल्यानंतर दोन दिवसातच तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी समोर आली आहे. आरती विजय भोसले वय 19 असे मयत तरुणीचे नाव आहे.</p>.<p>तरुणीच्या सासरीच घरात पलंगावर तरुणीचा मृतदेह आढळून आला असून सासरच्या मंडळीने तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा मुलीच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात रुग्णालयात घेतला होता.</p>