विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू
जळगाव

विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू

सासरच्यांनी घातपात केल्याचा आरोप

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जामनेर- Jamner - प्रतिनिधी :

तालुक्यातील खडकी येथील 27 वर्षीय विवाहीत तरुणीचा आज दि. 25 रोजी जामनेर येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणत असतानाच मृत्यू झाला. मात्र सासरच्या लोकांनी तिचा घातपात करून तिला जिवे मारल्याचा आरोप डोहरी येथील तिच्या माहेरच्या लोकांनी केला असून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला असता ,

इन कॅमेरा शव इच्छेदन करावे व सासरच्या सर्व लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा तिच्या आई वडील व भावाने घेतल्यामुळे मृत महिलेचे प्रेत शवविच्छेदनासाठी जळगाव येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत जामनेर पोलिस स्टेशनला मात्र अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की खडकी येथील अंजनाबाई तानाजी नाईक वय 27 ह्या विवाहित महिलेला आज उपचारासाठी जामनेर येथील एका खाजगी रुग्णालयात आणले असता रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून सासरचे लोक तिचे शवविच्छेदन न करता खडकी येथे घरी घेऊन गेले. व नंतर तिच्या माहेरच्या लोकांना फोन करून तिच्या मृत्यूची वार्ता कळविली. तिच्या माहेरच्या काका व भावाला तिच्या मृत्यूबद्दल शंका आल्याने त्यांनी पुन्हा सदर महिलेचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला .

सदर मृत महिलेच्या गळ्यावर दोराचे वन असून तिच्या पायाला मार लागला आहे असा आरोप माहेरच्या लोकांनी केला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला नसून सासरच्या लोकांनी घातपात केला. असा संशय व्यक्त करून जोपर्यंत सासरच्या सर्व लोकांवर गुन्हा दाखल होत नाही व त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृत महिलेचे शरीर ताब्यात घेणार नाही .त्याचबरोबर मृत महिलेचे शवविच्छेदन इनकॅमेरा करण्यात यावे या मागणीसाठी माहेरच्या लोकांनी सुमारे तीन-चार तास उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे राडा केला. दरम्यान सदर महिलाची मृतदेह जळगाव मेडिकल कॉलेज रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप पिंगळे हे करीत आहेत .

Deshdoot
www.deshdoot.com