११ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू अन् पित्याकडून गुपचूप दफनविधी

पिंप्राळा हुडकोतील धक्कादायक घटना
११ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू अन् पित्याकडून गुपचूप दफनविधी

जळगाव - Jalgaon :

शहरातील रझा कॉलनी येथे ११ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू होवून तिचा तिच्या वडीलांनी परस्पर दफनविधी केल्याचा धक्कादायक प्रकार आज मंगळवारी समोर आला आहे.

कनीज फातेमा जावीद अख्तर शेख असे मयत मुलीचे नाव आहे.

कनिजच्या जन्मानंतर तिच्या आजीचा मृत्यू झाल्याने तसेच इतर काही घटनांमुळे कनिज ही अपशकुनी असल्याने तिच्या जन्मदात्याने बापानेच तिचा जीव घेतल्याचा आरोप मयत कनीजचे मामा अजहर अली शौकत अली रा. अमळनेर यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अर्ज दिल्यावर चौकशीनंतर पोलिसांनी मयत कनीज हिचे वडील जावीद अख्तर शेख यास अमळनेर येथून ताब्यात घेतले आहे.

बुधवारी सकाळी मुलीचा मृतदेह उकरुन पंचनामा तसेच शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com