यावल दरोडाप्रकरणी भुसावळातील संशयिताला अटक

यावल दरोडाप्रकरणी भुसावळातील संशयिताला अटक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

यावल तालुक्यातील भरदिवसा व्यापार्‍याच्या दुकानावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ चाले (लोणारी) रा. मोहित नगर, भुसावळ यास अटक केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना यावल दरोड्यातील एक संशयित हा भुसावळता राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईच्या सुचना केल्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरीफोद्दीन काझी, किशोर राठोड, यूनूस शेख, विनोद पाटील, रणजीत जाधव यांच्या पथकाला रवाना केले होते.

पथकाने संशयित चंद्रकांत चाले यास अटक करुन पुढील कारवाईसाठी यावल पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com