जळगाव- Jalgaon

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा गावात अल्पवयीन मुलीचे तोंडावर रुमाल लावून तसेच तिचे ओढणीने हात पाय बांधून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना २२ रोजी दुपारी १२.४० वाजेच्या सुमारास घडली होती.

याप्रकरणी अत्याचार करणार्या नराधाम संशयित चेतन रविंद्र खैरनार रा. उचंदा ता.मुक्ताईनगर यास सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी जळगाव शहरातील इच्छादेवी येथून अटक केली आहे.

लग्न सोहळयासाठी अल्पवयीन मुलगी व संशयित तरुण गावात आले होते. यादरम्यान तरुणाने गावातील एका गिरणीत अल्पवयीन मुलीचे रुमालाने तोंड बांधले. तसेच ओढणीचे तिचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार केले. गिरणीत पत्र्यांचा आवाज झाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळ गाठल्यावर हा प्रकार उघड झाला होता.

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संशयित चेतन रविंद्र सुतार हा जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुलीवर असल्याची माहिती मुक्ताईनगरचे पोलीस निरिक्षक सुरेश शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कळविले.

माहिती मिळाल्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय बावस्कर, किशोर पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील, यांच्य पथकाने इच्छादेवी परिसरातून संशयित चेतन रविंद्र सुतार यास ८ वाजून ४५ मिनिटांनी अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून संशयितास ताब्यात घेण्यासाठी मुक्ताईनगर पोलीस रवाना झाले आहेत.