सुलोचना महानोर यांचे निधन

सुलोचना महानोर यांचे निधन

जळगाव - Jalgaon

मराठीतले सुप्रसिद्ध कवी पद्मश्री कविवर्य ना धो महानोर (Padmashree Kavivarya Mahanor) यांच्या पत्नी सौ.सुलोचना महानोर (Sulochana Mahanor)यांचे वृद्धापकाळाने दि.10 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता दुःखद निधन झाले, गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या.

मृत्युसमयी त्यांचे वय 79 वर्षे होते. शेती, साहित्य आणि रानात रमलेल्या कविवर्य महानोर यांच्या सहचारिणी म्हणून त्यांनी भक्कम साथ दिली. त्यांच्या पश्चात पती, 2 कन्या, 2 पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

शेतीमध्ये घेतला शेवटला श्वास

सौ.महानोर यांच्यावर जळगाव येथे इलाज सुरू होता. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती, अस्वस्थता ही वाढली होती. त्यांना जळगाव येथून त्यांच्या पळसखेडे येथील शेतात नेले व तिथे त्यांनी अंतिम श्वास घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com