स्टेशन उपप्रबंधकाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या
जळगाव

स्टेशन उपप्रबंधकाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

Balvant Gaikwad

येथील रेल्वे स्थानकावरील स्टेशन उपप्रबंधक यांनी धावत्या मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि.1) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या ओ.पी.टी.जी.विभागात भुसावळ रेल्वे फलाट क्रमांक 4 वरील स्टेशन उपप्रबंधक उपप्रबंधक मिलींद दिवाकर मार्कंडे (वय 54), रा.कुलकर्णी प्लॉट, भुसावळ यांनी स्वामी समर्थ मंदिराजवळ मालगाडीखाली झोकून देत, आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी 6 वाजेपूर्वी घडली.

घटनेचे वृत्त कळताच लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याबाबत जीआरपी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

Deshdoot
www.deshdoot.com