तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील योगेश्वर नगरातील 28 वर्षीय तरूण पराग गोकुळ खडके याने आपल्या राहत्या घरात छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे 5 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील योगेश्वर नगरातील रहिवासी पराग गोकुळ खडके (वय-28) रा. योगेश्वर नगर हा आपल्या आई भाऊ व पत्नीसह वास्तव्यास आहे.

पराग हा गेल्या आठ ते दहा वर्षांपासून एमआयडीसीतील छबी ईलेक्ट्रिक कंपनीत कामाला आहे. 27 मार्च रोजी रात्री मित्रांसोबत गप्पा मारून घरी आला.

त्यानंतर पगारने मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी झोपलेली असतांना छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

पाणी भरण्यासाठी उठताच उघउकीस आली घटना

आज 28 मार्च रोजी पहाटे 5 वाजता परागची आई शोभाबाई ह्या पाणी भरण्यासाठी उठल्या. त्यावेळी त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता परागने गाळफास घेतल्याचे दिसून आले.

मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com