जळगावात वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांसह वृध्दाची आत्महत्या

दोघांचा गळफास तर व्यावसायिकाने मेहरुण तलावात उडी घेत संपविले जीवन
जळगावात वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांसह वृध्दाची आत्महत्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील आज गुरुवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनांमध्ये तरुणासह वृध्दाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहेत.

यात समतानगरातील तरुणाने राहत्या घरात गळफास घेत जीवन संपविले तर अयोध्यानगरातील वृध्दाने मेहरुण तलावात उडी घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद झाली आहे.

अयोध्यानगरातील वृध्दाची मेहरुण तलावात आत्महत्या

शहरातील मेहरुण तलावात उडी घेवून लोटन पितांबर चौधरी (वय-62 रा. अयोध्यानगर ) या वृध्दाने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी समोर आली. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. आज गुरूवारी सकाळी घरात कोणालाही काहीही न सांगता ते घरातून निघून गेले होते. शहरातील मेहरूण तलावात त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीला आले.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी असीम तडवी व योगेश बारी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तलावातून मृतदेह काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तरूणाची आत्महत्या

जळगाव शहरातील समतानगर परिसरातील राजू पन्नालाल यादव (वय 30) हा आपल्या कुटुंबियांसह राहतो. राजु यादव यांचे जळगाव शहरातील आटोनगर मध्ये वाहन दुरूस्तीचे गॅरेज आहे. काल बुधवारी रात्री राजूने आपल्या परिवारासह जेवण केले. त्यानंतर घरात मागच्या खोलीत जावून रात्री 11 वाजता रहात्या घरात कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सुशील चौधरी हे करीत आहेत.

वेटरची आत्महत्त्या

जळगाव शहरातील नवीन बसस्टॅण्ड शेजारील भजेगल्ली जवळील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून पुथ्वीराज अनील बोराडे (वय-20,रा.पळासेडा ता.सोयगाव) काम करत होता. त्याने याने हॉटेलच्या स्टाफरुम मध्ये पंख्याला दोरी बांधुन गळफास घेतल्याची घटना घडली. अनियल बोराडे याच्या कुटूंबीयांना माहिती दिल्यावर त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली हेाती. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस नाईक प्रदिप पाटील करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com