'भावपूर्ण श्रद्धांजली'चे स्टेट्स ठेवत तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

असोदा रेल्वेगेटजवळील घटना; तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
'भावपूर्ण श्रद्धांजली'चे स्टेट्स ठेवत तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शौचास जाण्यापूर्वी आपल्या स्वत:ाच्या मोबाईवर भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत घरातून बाहेर पडलेल्या समाधान मुलचंद कोळी (वय- 28) रा. वाल्मिकनगर, आसोदा या तरुणाने असोदा रेल्वेगेटजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजेपूर्वी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहित अशी की, जळगाव तालुक्यातील असोदा येथील रहिवासी समाधान कोळी हा चायनीज, बिर्याणीची विक्री करुन आपल्या कुटुंबियांना हातभार लावित होता. शुक्रवारी सकाळच्या सुमारास समाधाने घरी शौचालयाला जावून येतो असे सांगत दुचाकीवरून घराबाहेर पडला.

त्यानंतर आसोदा रेल्वेगेट पासून काही अंतरावर असलेल्या खांबा क्रमांक 422/29 ते 423/01 च्या दरम्यान धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत त्याने आपली जीवनयात्रा संपविली.

पाहणी करीत असतांना आढळला मृतदेह

बराच वेळा झाला तरी समाधान हा घरी न आल्याने कुटूंबियांसह त्याच्या मित्रांनी समाधान याचा शोध सुरू केला. अखेर आसोदा रेल्वेगेटजवळ समाधानची दुचाकी आढळून आली. त्यानंतर रूळावर जावून पाहणी केली असता त्याचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत रेल्वे रुळावर आढळून आला. समाधानचा मृतदेह बधताच त्याच्या कुटुंबियांनी मनहेलावरणरा आक्रोश केला.

मृतदेह रुग्णालयात दाखल

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी साहेबराव पाटील व विलास शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला होता. दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

स्वत:च्या मोबाईलवर ठेवले भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस; आत्महत्येपूर्वी बहिणीला केला होता फोन

घरातून बाहेर निघण्यापूर्वी सकाळी समाधान याने स्वत:च्या मोबाईलच्या स्टेट्सला भावपूर्ण श्रध्दांजली असे स्टेट्स ठेवले असल्याची माहिती गावातील काही तरुणांनी पोलिसांना दिली. दरम्यान रात्री देखील समाधान याने स्टेट्स ठेवले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी समाधानने आपल्या बहिणीनीला फोन करुन तुला असोद्यात यावे लागेल असे सांगत आत्महत्या केल्याचे माहिती पोलिसांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com