तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

चाळीसगाव तालुक्यातील खेरडे येथील घटना
तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यतील खेरडे(सोनगाव) येथे तीन तरुणाकडून वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून एक १६ वर्षीय मुलीने विषारी द्रव सेवन करुन आत्महत्या केली आहे. हि घटना दि. १८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घटली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला मुलीच्या वडिलाच्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तरवृत्त असे की, मयत कु.मनिषा गोरख राठोड(१६) रा. खेरडे तांडा(सोनगाव) हिला गावातीलच विशाल एकनाथ राठोड, विलास पुरणदास चव्हाण, पप्पु चरणदास चव्हाण हे तिघे मयत मनिष राठोड हिला गेल्या १५ दिवसांपासू त्रास देत होते. तसेच दि,१८ रोजी तिच्या घरासोबर येवून दिला इशारे करीत असल्याने, या त्रासाला कंटाळून तिने घरातील मोनोसिल नावाचे विषारी द्रव सेवन करुन आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या वडिलाच्या फिर्यादीवरुन मनिषा राठोड हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला विशाल एकनाथ जाधव, विलास पुरणदास चव्हाण, पप्पु चरणदास चव्हाण यांच्या विरोधात भादवी कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय. संपत आहेर करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com