वटपौर्णिमेच्या दिवशीच विवाहितेची आत्महत्त्या

पतीसह चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा
वटपौर्णिमेच्या दिवशीच विवाहितेची आत्महत्त्या

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

माहेरुण पैसे आणावेत, मुलगा होत नाही यासह इतर घरगुती कारणांवरुन पतीसह सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून माधुरी राजेंद्र जाधव (वय 31) या विवाहितेने जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी मयत विवाहितेचे वडील रामचंद्र वामन पवार रा. पढावद ता. शिंदखेडा यांच्या फिर्यादीवरुन मयत माधुरीचे पती राजेंद्र दिलीप जाधव, सासरे दिलीप रामचंद्र जाधव, सासू संजूबाई दिलीप जाधव, जेठ चंद्रकांत दिलीप जाधव सर्व रा. आव्हाणे याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील माधुरी हिचा 2017 मध्ये जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील राजेंद्र दिलीप जाधव यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर काही महिने चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर पतीचा दूग्धव्यवसाय असल्याने म्हशी घेण्यासाठी माधुरी हिने माहेरुन पैस आणावते तसेच दोन्ही मुलीच झाल्या, मुलगा होत नाही, या कारणावरुन तिला पतीसह सासरे, सासू व जेठ यांच्याकडून वेळावेळी शिवीगाळ करुन मारहाण करण्यासह शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच तिला माधुरी हिस माहेर पाठवून देण्यात आले.

माहेरी आई वडीलांना समजूत घालून माधुरी हिस दोन ते तीन वेळा पुन्हा सासरी पाठविले. मात्र पुन्हा सासरी गेल्यावर माधुरी हिचा छळ करण्यात आला. याबाबत माधुरी हिचे वडीलांनी माधुरीच्या पतीसह सासरच्यांविरोधात शिंदखेडा येथील न्यायालयात खटला दाखल केला आहे. न्यायालयात खटला दाखल करण्यावरुन पतीने मारहाण केली. तसेच दोन्ही मुलींना स्वतःकडे ठेवून माधुरी हिस माहेरी सोडून दिले. मुलींची आठवण येत असल्याने माधुरी ही आव्हाण्याला गेली असता, पतीसह सासरच्यांनी तिला अंगणात मारहाण करुन घरात घुसू दिले नाही. पुन्हा माधुरीला तिच्या माहेरी सोडून दिले. या छळामुळे 27 एप्रिल 2021 पासून माहेरी आव्हाणे येथेच राहत होती.

मारहाण करुन मुलींना भेटण्यास केला होता मज्जाव

23 जून रोजी मुलींना भेटण्यासाठी माधुरी ही सासरी गेली. मात्र यावेळी सासरच्यांनी घरात घुसू दिले नाही, व मुलींनाही भेट दिले नाही. मारहाण करुन शिवीगाळ करुन हाकलून दिले. या मारहाणीबाबत माधुरी हिने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी दिली. त्यावरुन पतीसह सासरे, जेठ, व सासू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलिसांनी माधुरीच्या प्रेमनगर येथील बहिणीला संपर्क साधून त्यांच्यासोबत माधुरीला घरी पाठविले होते. त्याच ठिकाणी माधुरी मुक्कामी थांबली.

आज माधुरी बहिणीला काही एक न सांगता तिच्या घरातून बाहेर पडली. व पिंप्राळा रेल्वेगेटजवळ तिने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली. याप्रकाराची माहिती मिळाल्यावर माधुरी हिची बहीण पूनम व मेव्हणे कांतीलाल चौधरी यांनी तिला रुग्णालयात हलविले. याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पतीसह सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळूनच मुलगी माधुरी हिने आत्महत्या केली असल्याची तक्रार माधुरीचे वडील रामचंद्र वामन पवार यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृती केल्याप्रकरणी माधुरीचे पती राजेंद्र जाधव, सासरे दिलीप जाधव, सासू संजूबाई जाधव व जेठ चंद्रकात दिलीप जाधव याच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान माधुरी हिच्या पश्चात दोन मुली, आई वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com