विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील कुसूंबा शिवारातील शेतात कौटुंबिक तणावातून संगिता प्रकाश मोहिते (वय-33) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. दरम्यान विवाहिता काही वर्षापासून मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, संगिता प्रकाश मोहिते यांचे 15 वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. दोन वर्षापूर्वी पती सोडून गेल्याने संगीता यांना मानसिक धक्का बसला. व त्या माहेरी कूसूंबात भावाकडे वास्तव्यास होता.

भाऊ बांधकाम मजूर असल्याने त्याच्यासोबत मजूरी काम करायच्या. गेल्या काही दिवसांपासून संगीता आई वडीलांचे गावातील स्वतःचे घराचेच बांधकाम सुरु आहे. आज याचठिकाणी काम करत असतांना, अचानक संगीता मोहिते या निघून गेल्या.

कुठेतरी गेली असेल म्हणून भावाने दुर्लक्ष केले. काही वेळाने संगीता हिने गावातील यशवंत राजपूत यांच्या शेतात बहिणीने उडी घेवून आत्महत्या केल्याची पोलीस पाटील राधेशाम चौधरी यांनी मिळाली. त्यांनी अग्निशमन विभागाला संपर्क साधून प्रकार कळविला.

माहिती मिळाल्यावर अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी शशीकांत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधिकारी सुनील मोरे, प्रकाश चव्हाण ,अश्वजीत घरडे, देविदास सुरवाडे, रवींद्र बोरसे, तेजस जोशी, नितीन बारी , भगवान जाधव घटनास्थळ गाठले.

अनेक ठिकाणी उपचार मात्र फरक पडला नाही

अग्निशमन विभागाच्या प्रयत्नांनंतर विहिरीतून खाटीच्या सहाय्याने तब्बल दोन तासानंतर साडेतीन वाजता महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मयत महिला गावातील संगीता असल्याचे निष्पन्न झाल्यावर गावकर्‍यांनी ही माहिती संगीता यांचे भाऊ बळीराम बेलदार यांना मिळाली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर व होमगार्ड चेतन लाड यांनी पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. संगीता हिच्या पश्चात आई चंद्रकला, वडील श्रावण बेलदार, भाऊ बळीराम बेलदार, विशाल (वय-14) व विक्की (वय-12) ही दोन मुले असा परिवार आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पो.कॉ. सध्देश्वर डापकर, होमगार्ड चेतन लाड करीत आहे. दरम्यान संगीता ह्या मानसिक आजारी असल्याने त्याच्या उपचारासाठी त्यांचे वडील श्रावण बेलदार यांनी अनेक महाराज, बाबा यासह रुग्णालयात तिच्यावर उपचार केले.

यादरम्यान त्यांचे 90 हजार रुपये खर्च झाले. आज याच मानसिक आजारातून तिने आत्महत्या केली, अशी माहिती मिळाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com