मेहरुण तलावालगत वाहनचालकाची आत्महत्या

मेहरुण तलावालगत वाहनचालकाची आत्महत्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील तांबापुरा येथील गणेश रामदास अहिरे वय 40 या वाहन चालकाने मेहरुण तलावालगत झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सायंकाळी 6 वाजता समोर आली.

दरम्यान अहिरे याची आत्महत्या नसून घातपाताचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. तांबापुरा परिसरातील गौतम नगर येथे गणेश अहीरे हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. ते खाजगी वाहनावर चालक म्हणून उदरनिर्वाह भागवित होते.

आज शनिवारी दुपारी दीड वाजता गणेश अहिरे तांबापुरा परिसरातच राहणार्‍या शालक प्रविण चंद्रकांत वाघ याच्याकडे गेले. याठिकाणी थोडावेळ हसी मजाक केल्यानंतर रामदेववाडी येथे जावून पैसे घेवून असे सांगून अहिरे निघून गेले.

सायंकाळी शालक प्रविण वाघ यास व्हॉटस्अ‍ॅपवर गणेश अहिरे यांचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत फोटो मिळाला. चौकशी अंती गणेश अहिरे यांंनी मेहरुण तलाव परिसरात मागील बाजूस झाडाला गळफास घेतल्याचे समोर आले.

घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. दरम्यान गणेश अहिरे यांच्याकडे एक ते दीड लाख रुपये होेते, ते त्यांच्याकडे मिळून आलेले नाही.

मोबाईल, चाबी तसेच खिशातील पाकिट या वस्तू मिळून आल्या आहेत. गणेश अहिरे यांनी आत्महत्या केली नसून पैशांसाठी कोणीतरी त्यांचा घात केला असावा, असा संशय शालक प्रवीण वाघ याने व्यक्त केला आहे. मयत अहिरे यांच्या पश्चात पत्नी मंगला व मुलगा चेतन असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com