जळगाव : तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव

जळगाव : तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना

Ramsing Pardeshi

जळगाव - तालुक्यातील शिरसोली येथील तुषार ज्ञानेश्‍वर बारी (वय २१) या तरुणाने रविवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यास दुपारी ४.३० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात घेवून गेले असता त्याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.कळस्कर यांनी खबर दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास नाईक नितीन पाटील व जितेंद्र राठोड करीत आहेत. तुषार हा शेतीकाम करीत होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com